
कमलाई नगरी
सुभाबाई गणपत पवार रा. हिवर्डा ता. भुम जि. धाराशिव ह्या आजी करमाळा येथे दोन ते तीन दिवस झाल मुक्कामी आहेत. त्यांच्या सोबत कोण नाही हे लक्षात आले. त्यावेळी करमाळा प्रहार ता. उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी प्रहार परंडा ता.

अध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांना संपर्क करून विचारलं असता आमची चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं त्या आजी सोबत कोण नाही. त्यावेळी परंडा ता. अध्यक्षांनी सांगितले कोण सोबत असु अथवा नसु त्यांची अडचण दुर करा. त्यावेळी प्रहार

ता. उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी त्यांना दवाखान्यात नेहुन मोफत ऑपरेशन केले व त्यांचे सहकारी माजी सैनिक दोंडे यांनी स्वता घरून डबा पोहच केला. तसेच दत्तात्रय सुरवसे यांनी सुद्धा सहकार्य केले व वैद्यकीय हॉस्पिटल येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले असल्याचे सोमनाथ जाधव यांनी सांगितले आहे.


