
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास… ग्राम व शहर विकास… हे ब्रीद घेऊन विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात

आले आहे. यावेळी व्याख्यानमालेचे पहिले पुष्पगुंपण्यासाठी नेटाफिम एरिगेशन इंडिया प्रा.लि.चे संचालक अरुण देशमुख यांनी आधुनिक शेतीसाठी माती आणि पाण्याचे तंत्रज्ञान या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

उपसरपंच नाना झाकणे हे होते. याप्रसंगी शेतीचे भरघोस उत्पादन घ्यावयाचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे असे मत अरुण देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच शेतीमध्ये ठिबक सिंचन, सेंद्रिय खताचा वापर, मातीची

सुपीकता वाढवण्यासाठी गोधनाची वाढ आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी माणसांमध्ये वैचारिक बदलाची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच जल है तो कल है असे सांगत पाण्याचे महत्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राखी यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एम.डी. जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्रीरंग मेहेर, भुजबळ,

गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ प्रा.जयंत भांगे, प्रा. डी. एस.जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
