करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढ झाली असून सदर कुत्रे लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, वयोवृद्ध व्यक्तींच्या अंगावर धाऊन जात असल्याने अशा कुत्र्यांना न मारता त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, भटके कुत्रे हे विद्यार्थी, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती सावध नसताना अंगावर धाऊन जात आहेत तसेच जनावराना भर दिवसा फाडून जीवे मारत आहेत. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांबाबत सर्वसामान्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही मोठी जीवीत हानी होण्याच्या आगोदर नगरपरिषदेने तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी किल्ला विभागातील पूजा मनसुके, हर्षदा सुरवसे, भक्ती गायकवाड, संगिता गायकवाड, माहेश्वरी कारंडे आदि महिला उपस्थित होत्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *