करमाळा प्रतिनिधी

21 जानेवारी पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ अरिस्टो किड्स आयोजित स्पर्धेत जातेगाव मधील विद्यार्थ्यांनी विक्रमांचा उंचांक मिळवलेला आहे. या परीक्षेसाठी एकूण 11 देशातून विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन या माध्यमातून सहभागी होते एकूण तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाच ते सहा

मिनिटांमध्ये शंभर गणिते अचूक सोडवणे आणि अनिवार्य होते. या परीक्षेसाठी विद्यार्थी अपेक्षेपेक्षाही जास्त सराव करत होता व त्यांच्या मेहनतीचा हा विक्रम जातेगाव मधील विद्यार्थ्यांनी केलेला आहे व जातेगाव चे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेले आहेत.

यश भांडवलकर आंतरराष्ट्रीय प्रथम क्रमांक, हार्दिक कदम आंतरराष्ट्रीय तिसरा क्रमांक, शौर्य वारे ग्रँड चॅम्पियन तिसरा क्रमांक, समर्थ शिंदे, वेदांत वारे, प्रणव काळे शौर्य शिंदे आंतरराष्ट्रीय चौथा क्रमांक व विवेक माने, विराज कामटे यांना पार्टीसिपेट ट्रॉफी व सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळालेले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले तसेच मुख्याध्यापक थोरात गुरुजी यांचेही मार्गदर्शन लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *