करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहर व तालुक्यात मटका तेजीत,रोज लाखो रुपयांची बुक्की घेणारे बुक्की मालक मात्र मोकाट फिरत आहेत गल्लोगल्लीत मटका चालू आहे. मध्यंतरी किरकोळ मटका चालकांवर गुन्हे दाखल केले परंतु मेन बुक्की चालक सोडले.

करमाळातील रोज लाखो रुपयांचा मटक्याचा धंदा घेतात. त्यांच्या हाताखाली दोन दोनशे मटका एजंट गोरगरीब काम करतात. या बुक्की चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस पोलीस का दाखवत नाहीत असा अर्थपूर्ण सवाल नागरिकांतून होत आहे.

करमाळ्यात मटका बुक्की चालकांचे पेव फुटले असून करमाळातील जेऊर, जिंती, पारेवाडी, साडे, सालसे, घोटी या अनेक ठिकाणाहून बुक्की एजंट मोबाईल द्वारे मटका घेतात. हे उघड सत्य आहे. केवळ किरकोळ हातावरचे पोट असलेल्या गोरगरीब मटका एजंट ला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असल्याचे रेकॉर्ड पुर्वीचे आहे.

तालुक्यात गोरगरीब पानपट्टी टपरी अशा ठिकाणावर स्वतःच्या प्रपंच चालविण्यासाठी किरकोळ मटका घेणारे तीनशे ते चारशे एजंट आहेत. यांचे मालक असणारे बुक्की चालक मात्र मोकाट आहेत. या मटक्यात अनेक व्यापाऱ्यांची मुले गुरफटली असून त्यांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत. या मटका विरोधात कोणाचे बोलायचे धाडस होत नाही तरी नवीन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मेन बुक्की चालकांवर गुन्हे दाखल करावेत व तालुक्यातील युवक, गोरगरीब जनतेला या विळख्यातून वाचवावे अशी मागणी तरटगावचे मा. सरपंच राजकुमार घाडगे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *