
करमाळा प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे यशपाल कांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी भाजपचे शशिकांत पवार हेही होते. निवेदनात म्हटले आहे की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आयडीबीआय बँक ते आयसीआयसीआय बँक कॉर्नर पर्यंत गटार खंदून ठेवलेले आहे व रस्त्याचे काम सुद्धा बंद ठेवलेले आहे. काही दिवसांपूर्वी या

रस्त्यावर दोन ते तीन अपघात झालेले आहेत व वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच गटारी खंदून ठेवल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्यामध्ये पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. हे काम कोणत्या कारणामुळे बंद आहे हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही.

या मार्गावर होटकर हॉस्पिटल, शेटे हॉस्पिटल, बिनवडे हॉस्पिटल, कन्या प्रशाला व अण्णासाहेब जगताप हायस्कूल तसेच शाहूनगर, कृष्णाजी नगर, श्रावण नगर, बालाजी नगर, गणेश नगर,सिंचन नगर, एसटी कॉलनी या ठिकाणचे बहुसंख्य

नागरिक ये-जा करत असतात तसेच हा करमाळा ते परांडा, बार्शी, कुर्डवाडी मोठ्या वाहतुकीचा रस्ता असून येथील नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या सर्व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी व पुढील होणारे अपघात

टाळण्यासाठी आपण गटारीचे काम व रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे. यावेळी तानाजी गावडे, कमलेश कास्विद, अजय खंडागळे, पिंटू इंदुरे, केतन इंदुरे, भाऊसाहेब वीर, मिनू खोले, संभाजी चव्हाण, मंगेश गायकवाड, जावेद शेख, इत्यादी जण उपस्थित होते.
