करमाळा प्रतिनिधी
गावखेड्यात जावुन युवासेना भक्कम करून सर्वसामान्य शेतकरी, युवक, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांनी केले. ते करमाळा येथील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणी बैठकीत बोलत होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, माजी शिवसेना तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुका समन्वयक कुमार माने, शहरप्रमुख समीर हलवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव उपस्थित होते.
युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात युवासेनेची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी वर्षभरात युवासेनेकडुन केलेली आंदोलने मोर्चे यांची माहिती देण्यात आली तसेच ग्रामीण भागातील युवकांच्या उपतालुकाप्रमुख, तालुका चिटणीस, विभाग प्रमुख, गट प्रमुख पदावर निवडी करण्यात आल्या.
तालुका चिटणीस पदी पाडळी येथील पांडुरंग शिंगटे, कोर्टी गट उपतालुकाप्रमुख पदी दिवेगव्हाण येथील अभिषेक मोरे, वांगी जिल्हापरिषद गट उपतालुकाप्रमुख पदी वांगी येथील रामेश्वर पांढरमिसे, केम जिल्हापरिषद गटाच्या उपतालुकाप्रमुख पदी साडे येथील माऊली फरतडे, पांडे जिल्हापरिषद गट उपतालुकाप्रमुख पदी पाडळी येथील पांडुरंग ढाणे, विट जिल्हापरिषद उपतालुकाप्रमुख पदी गुळसडी येथील समाधान यादव यांची नियुक्ती करण्यात आली.
कोर्टी विभाग प्रमुख पदी पारेवडी येथील विशाल काळे, विट विभाग प्रमुख पदी विट येथील इश्वर जाधव, वांगी विभाग प्रमुख पदी शेटफळ येथील सोमनाथ पोळ, पांडे विभाग प्रमुख पदी तरटगाव येथील आनंद घाडगे यांच्या निवडी करण्यात आल्या.
वांगी गटप्रमुख पदी प. सोगाव येथील मयुर तावरे, कुंभेज गटप्रमुख पदी सरपडोह येथील हणुमंत रंदवे, रावगाव गटप्रमुख पदी वडगाव येथील बालाजी वाडेकर, पांडे गटप्रमुख पदी करंजे येथील आकाश सरडे यांची नियुक्ती करण्यात आली. युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल, माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सदर निवडी पार पडल्या.
चौकट
प्रत्येक गावात युवासेनेची शाखा स्थापन करणार.
तालुक्यातील प्रत्येक गावात युवासेनेची शाखा स्थापन करून समाजेसेवेची व राजकारणाची आवड असणाऱ्या युवकांचे संघटन मजबूत करणार असून उपविभाग प्रमुख, उपगट प्रमुख या पदांच्या देखील लवकर निवडी करण्यात येणार आहेत. युवकांबरोबरच शेतकरी, सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व करण्यासाठी युवकांनी युवासेनेत सामील व्हावे.
या बैठकीस उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर यांच्यासह बहुसंख्य युवासैनिक उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत आज करमाळा युवासेनेची बैठक पार पडली. यावेळेस माउली फरतडे, पांडुरंग ढाणे, रामेश्वर पांढरमिसे, अभिषेक मोरे यांची उप तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली – शंभूराजे शाहुराव फरतडे [तालुकाप्रमुख युवासेना करमाळा]