
करमाळा प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात नमो उद्यान ही संकल्पना राबवून अबाल वृद्धांसाठी नवीन बाग बगीचा तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करमाळा शहरात नवीन उद्यान बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्याबद्दल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मोहीनीताई सावंत यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

याबाबत बोलताना महेश चिवटे म्हणाले की, नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत यांच्या माध्यमातून करमाळा नगरपालिका अंतर्गत सिमेंट रस्ते बांधण्यासाठी 15 कोटी रुपये ठोक अनुदानाची मागणी केली असून या अनुदानाला सुद्धा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

तसेच करमाळा देवीचामाळ रोड सुशभीकरण दुभाजक लाईट यासाठी एक कोटी रुपयांचा निधी बांधकाम खात्यामार्फत मंजूर होणार असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या माध्यमातून दलित मुलांसाठी स्वतंत्र वस्तीगृह बांधण्यासाठी दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत यांनी शासन दरबारी दिला आहे.

………………………
नरेंद्र मोदी उद्यान असे या बगीचाला नाव देण्यात येणार असून हे काम अत्यंत दर्जेदार करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे अशी माहिती मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे.