करमाळा प्रतिनिधी

मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल न दिल्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून कारखाना मालमत्तेवर बोजा चढवुन तात्काळ ऊस बिल देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून 26 जानेवारीपुर्वी ऊस बिल न दिल्यास आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्रा.रामदास झोळ यांनी सांगितले. श्री मकाई सहकारी साखर

कारखान्याचे थकीत बिल 25 डिसेंबर पर्यंत देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आले होते. 25 डिसेंबर तारीख उलटून गेली तरी ऊस बिल न मिळाल्याने आम्ही मकाई प्रशासनाचा जाहीर धिक्कार करत 26 जानेवारी रोजी

आत्मदहन करणार असल्याचे निवेदन प्राध्यापक रामदास झोळसर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ कांबळे, ॲडव्होकेट राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, शिवशंकर जगदाळे,  हरिदास मोरे, प्रा .राजेश गायकवाड, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, आदिनाथचे माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, काँग्रेस ओबीसी

तालुकाध्यक्ष गफुर शेख यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांच्या सहयाचे निवेदन तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. सदर निवेदनात असे  म्हटले आहे की, आम्ही संगोबा निलज येथील शेतकरी राजेश गायकवाड यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत ऊस बिल देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे ते उपोषण स्थगित केले होते. आम्हाला वाटले ऊस

बिल शेतकऱ्याच्या खाती जमा होईल परंतु या आश्वासनाची पूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा पारा वाढल्यामुळे सुरुवातीला बोंबाबोंब आंदोलन केले. त्यानंतर तरी मकाई कारखान्याच्या प्रशासनाला व नेत्यांना काहीतरी लाज वाटेल, ऊस बिल मिळेल अशी आशा होती परंतु त्यांनी दिलेले आश्वासन तारीख फोल ठरली. त्यानंतर आम्ही तहसील कचेरी करमाळा येथे

माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या पुतळ्याला जोडे मारून थू-थु आंदोलन केले. यानंतर मात्र त्यांनी या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांना 25 डिसेंबर पर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले.

आम्हाला वाटले आमची ऊस बिल नक्की मिळेल व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी प्रशासनाच्या रेट्यामुळे मकाई चेअरमन संचालक मंडळा काही तरी लाज बाळगुन ऊस बिल देतील पण तसे झाले नाही आज पंचवीस तारीख उलटूनही कुठल्याही प्रकारचे हालचाल मकाई कारखान्याचे वतीने दिसून येत नसल्यामुळे नक्की शेतकऱ्यांचे ऊस बिल कधी देणार असा यक्ष प्रश्न शेतकरी बांधव ऊस वाहन मालक यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता लढाई आरपारची लढाई झाली असून शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या दिग्विजय बागल यांच्या नावाचा निषेध करत तहसील कचेरी व पोलीस स्टेशन समोर सर्व शेतकऱ्या बांधवांचे वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऊस बिल ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणत आमचे ऊस बिल तात्काळ मिळावे अन्यथा चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत कारखाना व कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढवुन थकीत ऊस बिल देण्याची मागणी शेतकरी बांधवांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *