करमाळा प्रतिनिधी

मौजे घारगाव या ठिकाणी आज दुपारी दोनच्या दरम्यान लाईटचे शॉर्टसर्किट होऊन जमीन गट नंबर 93 मधील खातेदार सुरेखा कैलास गायकवाड यांचा एक हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे. शेतातून जाणाऱ्या एलटी लाईन MECB मध्ये

शॉर्टसर्किट होऊन आग लागून उसाचे नुकसान झाले आहे. सदर जमिनीमध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झालेला आहे. तसेच सोबत शेती उपयोगी साहित्य वायर, पाईप व इतर साहित्य जळून गेल्याचे दिसून येत आहे. पंचा समक्ष घारगावचे तलाठी

क्षिरसागर भाऊसाहेब आणि वायरमन भरणे यांनी घटनास्थळी समक्ष भेट देऊन पंचनामा केला. सदर ठिकाणी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आणि ऊस जळून खाक झाला. त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *