पाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह
करमाळा प्रतिनिधी
पाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त 9 दिवसीय अखंड हरिनाम सप्तहाचे आयोजन

करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त 9 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


गुरुवार दिनांक 28 – 12 – 2023 ते गुरुवार दिनांक 04 – 01- 2024 कालावधीत सप्ताह संपन्न होणार आहे.या सप्तहानिमित्त काकडा आरती ( सकाळी 5 ते 6),ज्ञानेश्वरी पारायण ( सकाळी 7 ते 11),हरिपाठ ( संध्याकाळी 5 ते 6),प्रवचन ( संध्याकाळी 7 ते 8),भोजन( 8 ते 9 ),किर्तन( 9 ते 11 ) रात्रीचे बारा अभंग ( रात्री 11 नंतर) हे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत.
गुरुवार दिनांक 28 – 12 – 2023 हभप पुरुषोत्तम सुतार महाराज यांचे किर्तन व हभप अंकुश काळे महाराज यांचे प्रवचन, शुक्रवार दिनांक 29 – 12 – 2024 रोजी हभप स्वप्नील शिंदे महाराज यांचे किर्तन व हभप बळीराम गुरव महाराज यांचे प्रवचन तर शनिवार दिनांक 30 – 12 – 2024 रोजी हभप प्रदीप जाधव महाराज यांचे किर्तन व हभप अंकुश काळे महाराज यांचे प्रवचन तर रविवार दिनांक 31 – 12 – 2023 रोजी हभप धनाजी लोखंडे महाराज व प्रवचन हभप मच्छिंद्र तळेकर गुरुजी तर

सोमवार दिनांक 1 – 1 – 2024 रोजी हभप भरत वाजे महाराज यांचे किर्तन व हभप माणिक कोंडलकर महाराज यांचे प्रवचन तर मंगळवार दिनांक 2 – 1 – 2023 रोजी हभप स्वप्नील शिंदे महाराज यांचे किर्तन व हभप मच्छिंद्र नागरे ( सर ) यांचे प्रवचन तर बुधवार दिनांक 3 – 1 – 2024 रोजी हभप विनोद रोकडे महाराज यांचे किर्तन व मारुती देवकर महाराज यांचे प्रवचन तर गुरुवार 4 – 1 – 2023 रोजी हभप संजयानंद झानपुरे महाराज यांचे किर्तन व हभप रोहिदास मस्तुद यांचे प्रवचन तर शुक्रवार दिनांक 4 – 1 – 2023 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप स्वप्नील शिंदे महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व ठीक 12 वाजता पुष्पवृष्टी आरती व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व दुपारी 3 वाजता दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. सदर नऊ दिवसीय अखंड हरिनाम सप्तहाचे समस्त पाथुर्डी ग्रामस्थांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *