
जेऊर प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ते 22 डिसेंबर दरम्यान मौजे टेंभुर्णी ता. माढा येथे महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये पुणे विभागीय शालेय

मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत भारत हायस्कूल जेऊर येथील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेला सुमित सरक हा 14 वर्ष आतील मुलाच्या गटात सहभागी झाला होता. त्या मध्ये तो विजयी झाला असून त्याची

उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 29 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

सुमित सरक यास महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशन चे राज्य सहसचिव आणि आंतररष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमारे सर आणि राष्ट्रीय पंच बाळासाहेब शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडू सुमित तसेच मार्गदर्शक शिक्षक पांडुरंग वाघमारे

सर आणि बाळासाहेब शिंदे सर यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष राजूशेठ गादिया, सचिव प्रा. अर्जुनराव सरक सर, सरपंच पृथ्वीराज पाटील, पाटील गटाचे प्रवक्ते तसेच संस्था सदस्य सुनील

तळेकर, प्राचार्य दहीभाते सर, उपप्राचार्य नागेश कांबळे सर, पर्यवेक्षक बी. एस. शिंदे सर व सर्व संस्था सदस्य, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
