२५००० घरकुलांना मान्यता देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत – सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर
करमाळा प्रतिनिधी
धनगर समाजासाठी वैयक्तिक घरकुल सुरु झाली असून या समाजातील ज्या लोकांकडे अद्याप स्वतःचे पक्के घर नाही ते यां योजनेचा लाभ घेऊ शकतात. धनगर समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव राज्य शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश आहेत. याबाबत सहाय्यक संचालक मनीषा फुले यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना एक पत्रक जारी केले आहे. यानुसार १० जानेवारी

२०२४ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे स्वतःचे पक्के घर नसणाऱ्या धनगर बांधवानी आपल्या गावचे ग्रामसेवक, सरपंच किंवा गटविकास अधिकारी यांचेशी संपर्क

साधून प्रस्ताव दाखल केल्यास त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो. सदर योजनेअंतर्गत सन २०२१-२२ व सन २०२२-२३ मध्ये शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावांना शासनस्तरावरुन प्रशासकीय मान्यता (कायर्योत्तर) देण्यात आली असून निधी वितरीत करण्यात आलेला आहे.


सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात २५००० घरकुलांना मान्यता देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *