करमाळा प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या निधीतून जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 मध्ये लेखाशीर्ष 3054-2081 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करणे यासाठी 3 कोटी 72 लाख निधी मंजूर झाला असून तालुक्यासाठी 2 कोटी 64 लाख तर 36 गावासाठी 1 कोटी 8 लाख असा 3 कोटी 72 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या विकासासाठी गुळसडी ते खंडागळे वस्ती, वडगाव पठाण वस्ती जोडमार्ग, घोटी ते क्षीरसागर वस्ती, निंभोरे ते साखर कारखाना, लव्हे ते कवडे वस्ती, वांगी नंबर 3 ते आदिनाथ कारखाना, पाडळी ते साळुंखे वस्ती, वांगी नंबर 1 ते मंगवडे रस्ता, फिसरे ते सौंदे रस्ता हे ग्रामीण मार्ग तसेच

देवळाली, पांडे, अर्जुननगर रस्ता, सौंदे, गुळसडी, देवळाली रस्ता, आवाटी, नेरले रस्ता या इतर जिल्हा रस्त्यांसाठी असा 2 कोटी 64 लाख निधी करमाळा तालुक्यासाठी मंजूर झाला आहे तर माढा तालुक्यातील 36 गावांसाठी घाटणे ते भुताष्टे रस्ता, कुर्डू ते बारलोणी रस्ता, म्हैसगाव ते वडशिंगे रस्ता, दहिवली ते जगताप वस्ती रस्ता, सुरली ते अकोले खुर्द रस्ता, कुर्डू ते कोलदरा पिंपळखुटे रस्ता या रस्त्यासाठी 1 कोटी 8 लाख रुपये निधी असा एकूण 3 कोटी 72 लाख निधी मंजूर आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *