
करमाळा प्रतिनिधी
जय श्रीराम च्या घोषणा देत अक्षता मंगल कलश शोभायात्रा करमाळा शहरात काढण्यात आली होती. मंगळवार, 19 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:00 वाजता अक्षता मंगल कलश शोभायात्रा या अलौकिक सोहळ्यासाठी हिंदू बांधव मोठ्या संख्येने

उपस्थित होते. सुरूवात मारुती मंदिर किल्ला वेस, टाऊन हॉल चौक, भाजी मंडई, सुभाष चौक, जय महाराष्ट्र चौक, फुलसौंदर चौक, किल्ला वेस अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी महिला भगव्या पहरावात, नागरिक भगव्या टोप्या, झेंडे,

गमजा, पसरावात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आदी विविध हिंदू संघटनेचे शहर ग्रामीण भागातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप रामलल्लाची आरती करून करण्यात आली आहे.



