
करमाळा प्रतिनिधी
आज 8 महिने रिक्त असलेल्या करमाळा तहसीलदार पदावर लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या ठोकडे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी त्यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवरायांचा फोटो शाल व

श्रीफळ देऊन करण्यात आला व ठोकडे मॅडम ज्या कामासाठी चर्चेत आहे त्या कामाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नवनियुक्त तहसीलदार मॅडम यांना देण्यात आले. निवेदन असं आहे कि, करमाळा तालुक्यात बेकायदेशीर

वाळू, मुरुम बेसुमार उपसा होत आहे तसेच शहर व ग्रामीण भागात ही बेकायदेशीर दारू विक्री होत आहे. यात अनेक गोरगरीब कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत तसेच दारु, हातभट्टी चे अड्डे, झुगार, मटका ईतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. यावर

कुठल्याच अधिकरी व प्रशासनाचे नियंत्रण नाही तरी आपण आपल्याला असलेल्या अधिकारातुन या बेकायदेशीर उध्योगांवर कारवाई करून तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. निवेदन देते

वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी आंण्णा गोडगे, जि. उपाध्यक्ष दिपक शिंदे, ता. अध्यक्ष सुदर्शन शेळके, ता. युवा अध्यक्ष अमोल घुमरे, पक्षाध्यक्ष बापू फरतडे, सरपंच फुंदेवाडी किरण आंण्णा फुंदे, ता. कार्याध्यक्ष राहूल पवार,

ता. उपाध्यक्ष बापू वाडेकर, शाखा अध्यक्ष अशोक लवंगारे. रयत चे ता. अध्यक्ष शिवशंकर जगदाळे, गणेश जाधव, जोतीराम धगाटे, ई. शेतकरी उपस्थित होते.