करमाळा प्रतिनिधी

गेली आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या करमाळा तालुक्याच्या तहसीलदार पदी माढा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या आणि सोलापूर जिल्ह्यात सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर येथे धडाकेबाज कामगिरी केलेल्या शिल्पा ठोकडे यांची निवड

झाली. करमाळा तहसील कार्यालयात त्यांनी आज तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर नूतन तहसीलदार ठोकडे यांचा आमदार संजय मामा शिंदे समर्थकांकडून सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

गटाचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांच्या हस्ते शाल, पुष्प, गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या की, सर्वसामान्य लोकांचे विविध प्रश्न त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम

करावे, मी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी तुमच्या सोबत असेल. महसूल प्रशासनाचे कामाचे कौतुक करत असताना काही त्रुटी असतील त्या सुद्धा माझ्या निदर्शनास आणून द्यावेत मी चांगल्या कामासाठी नेहमी सहकार्य करेल असा विश्वास

त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. यावेळी फुंदेवाडी चे सरपंच किरण फुंदे, गुळसडी गाव चे युवा नेते मानसिंग खंडागळे, काशिनाथ डुकरे, मेजर राजाराम जाधव, प्रवीण शियाळ व अनेक संजयामामा शिदं समर्थक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *