करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायतच्या रिक्त सरपंच पदा करीता एकमेव अर्ज आल्याने पाटील, जगताप गटाचे निवृत्त इंजि. अंकुश दादा शिंदे यांची  बिनविरोध निवड झाली आहे. या प्रसंगी निवडणुक अधिकारी म्हणून सर्कल विनोद

बनसोडे, तलाटी सोमनाथ खराडे, हर्षल शिंगाळे, ग्रामसेवक हरिभाऊ दरवडे, पोलिस पाटील संदीप शिंदे पाटील, कोतवाल रवी जाधव, शिपाई शांताराम जाधव, सुनील जाधव, हमीद शेख तर पाटील, जगताप, बागल गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते

मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. बिनविरोध सरपंच निवडी नंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करून भव्य मिरवणूक व संध्याकाळी तिखट जेवणावळीच्या पंगतीचा थाट पार पडला. तिर्थक्षेत्राला बाहेर गावी चार दिवसां

करिता ग्रामपंचायतचे आठ सदस्यांची एकजूट ठेवण्या करीता माजी चेअरमन प्रभाकर शिंदे, माजी सरपंच जयद्रथ शिंदे, छगन शिंदे, छगन जाधव, विठ्ठल शिंदे यांनी परिश्रम घेतले. गत निवडणूक काळात बागल गटाला अडीच तर पाटील जगताप गटाला

अडीच वर्षांचा फॉंरमिला ठरला. त्या कालावधीत बागल गटाचे धंनजय झिंजाडे यांनी जवळपास तीन वर्षां करीता सरपंच पद भूषविले. त्याच दरम्यान बागल गटांचे रघुवीर जाधव यांना सरपंच पदाचा शब्द मिळवून त्यांना सरपंच पद न मिळाल्याने जाधव यांचा बागल गटावर दबक्या आवाजात नाराजीचा सूर आहे. मागील राजीनामा नाट्य व अटी-तटीच्या प्रयत्नाने आखेर पाटील गटाला उर्वरित जवळपास दोन वर्षां करीता अंकुश दादा शिंदेंच्या रूपाने पोथरे-निलजला नवे अविरोध सरपंच लाभले आहेत. यावेळी धनंजय झिंजाडे यांच्यासह उपसरपंच दीपाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनीता झिंजाडे, दीपाली झिंजाडे, जनाबाई शिंदे, सुनीता गायकवाड, रेखा झिंजाडे, संजय जाधव, संतोष ठोंबरे, रघुनाथ जाधव, विठ्ठल शिंदे, राणी काळे समक्ष निवड झाली. यावेळी माजी सरपंच धनंजय झिंजाडे म्हणाले की, निवडणुकी वेळी ठरल्याप्रमाणे गटाचा आदेश मानून मी राजीनामा दिला.  सदस्यांनीही मला गावचा विकास करण्यासाठी मोठी साथ दिली. गावात अनेक कामे करता आली. गावच्या विकासासाठी सरपंच व प्रशासन यांनीही वेळोवेळी सहकार्य केले असे झिंजाडे यांनी म्हटले. तर नुतन सरपंच निवड व आभार प्रसंगी अंकुश शिंदे म्हणाले की, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तालुक्यात आदर्श गाव करण्यास प्रयत्नशील राहणार. गावातील सर्व सामान्य माणसाला शासकीय योजनांची माहिती व कार्यशाळा घेतल्या जातील.

गाव विकासा करीता अंतर्गत शाळा, शासकीय कार्यालय, रस्ते, मुरुमीकरण गटारी, जलजिवन पुरवठा,जल शुद्धीकरण योजना व नदीवरील बंधारे,शनि मंदिर,श्री क्षेत्र संगोबा मंदिर अ वर्ग करीता पाठपुरावा करणार. असल्याचे सुतोवाच नुतन सरपंच अंकुश दादा शिंदे यांची आभार प्रसंगी व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *