
करमाळा प्रतिनिधी
ओम भीशी मंडळाने मुकबधीर विद्यालय देवीचामाळ येथे विद्यार्थ्यांसाठी फळेवाटप व तेलडबा देऊन सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव यांनी केले. ओम महिला मंडळ,

ओम बचत गट, ओम भिशी गृप कडून सदैव सामाजिक उपक्रम राबवले जातात. आजही असाच हा उपक्रम राबवून एक सामाजिक जबाबदारी उचलली असे मत अंजली राठोड श्रीवास्तव यांनी मांडले. डॉ. कविता कांबळे यांना मनोगत मांडताना

गहिवरून आले. आपण पाच मिनिटे पण शांत राहू शकत नाही. इथं तर ही मुलं किती शांत बसली आहेत. ओम महिला मंडळ व भिशी मंडळ सदैव आपल्या शाळेच्या उपयोगी पडेल असे मत डॉ. कविता कांबळे यांनी मांडले. श्रीवास्तव दांपत्याचा आदर्श

घेऊन आज आम्ही मोठे झालो आहोत. आम्हाला अभिमान आहे असे मार्गदर्शक आम्हाला लाभले, असे मत रोहन भालेराव सरांनी मांडले. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रोहन भालेराव सरांचा ही मंडळांकडून सत्कार करण्यात आला.

नगरसेविका राजश्री माने, उषा बलदोटा, अंकिता श्रीवास्तव आहुजा, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. मितवा श्रीवास्तव अग्रवाल, ज्योती भोजने, अभिलाषा मुसळे यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन ज्योती ताई पांढरे यांनी केले. पुष्पा लुंकड यांनी आभार मानले.