करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील रहिवासी व 73 वर्षाच्या निराधार असलेल्या पुष्पा किसन गानबोटे यांना गेली दीड वर्षापासून रेशन दुकानातून अंगठे लागत नसल्याने धान्य मिळत नव्हते व त्या सदर हक्काच्या धान्यापासून वंचित राहत होत्या. त्यामुळे त्यांनी धान्य मिळत नसल्याची  तक्रार शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात केली

होती. त्यांनतर स्वत: गायकवाड यांनी गानबोटे यांना सोबत घेवून नायब तहसिलदार विजयकुमार जाधव यांची भेट घेतली व तहसिलदार यांनीही तात्काळ कार्यवाही करीत रेशन धान्य देण्यासाठी संबंधितंना सुचित केले. तदनंतर गानबोटे यांना तात्काळ रेशन धान्य व आंनदाचा शिधा सुध्दा देण्यात आले. शिवसेनेने केलेल्या प्रयत्नामुळे निराधार महिलेस आधार मिळाला असल्याची भावना यावेळी गानबोटे यांनी भावनीक होवून बोलून दाखविली.  

यावेळी बोलताना शिवसेना महिला तालुका प्रमुख गायकवाड म्हणाल्या की, अनाथांचे नाथ असलेले महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निराधार, गरजू, महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न करीत असून विविध योजना राबवीत आहेत.  गानबोटे यांचे रेशनबाबत काही तांत्रीक अडचणी होत्या त्या दूर झाल्या असून नायब तहसिलदार जाधव व

रेशन दुकानदार चिवटे यांनी तात्काळ कार्यवाही करीत रेशन मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार गायकवाड यांनी मानले व यापुढे ज्या महिलांना शासकीय योजनेचे लाभ मिळताना अडचणी येत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी गायकवाड यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *