करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगर परीषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रना बंद अवस्थेत असुन केवळ क्लोरीन व तुरटी मिश्रीत पाण्याचा पुरवठा अवेळी आणि खंडीत

स्वरूपात होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची कोणतीच स्वच्छता झालेली नाहि. अशुद्ध पाण्यातील शैवाल काढण्यासाठी असलेली सी.एफ.एल. यंत्रणा व मोटारी बंद अवस्थेत आहे.  तसेच जलशुद्धीकरणासाठी असणारी

क्लॅरीफल्क्युलेटर मिक्स्चर यंत्रनाहि पुर्ण बंद अवस्थेत आहे. करमाळा शहरात सध्या अनेक ठिकाणी गटारी जवळील लिकेज पाईपमधूनहि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक नागरिकांकडून याबाबत तक्रार दाखल असताना कोणतीही कारवाई अद्याप झालेली नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

सामान्य नागरिक अधिक बोलल्यावर संबंधित तक्रारदार नागरीकाची पालिकेची थकबाकी तपासुन नळ जोडणी तोडण्याची धमकी देण्यात येते परीणामी तक्रारदार नागरिक निमुटपने सर्व सहन करतो.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *