शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाची रक्कम 25 डिसेंबर पर्यंत देऊ मा. जिल्हाधिकारी यांचे आश्वासन

करमाळा प्रतिनिधी

श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी बोंबाबोंब आंदोलन व इतर आंदोलन झाल्यानंतर आज पुन्हा तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या वर जीवनावश्यक वस्तू अधिनियम केंद्रीय ऊस नियंत्रण आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करून घ्या आणि त्यांच्या

खाजगी मालमत्ता वर  बोजा चढवण्या संदर्भात  थू थू आंदोलन करण्यात आले.  यावेळी  पुतळ्याला तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांचा चेहरा लावून  गाढवाला चेहरा लावून मिरवणूक काढण्यात आली.  दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्याकडे एक बैठक घेतल्यानंतर आंदोलन कर्ते ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर,

रवींद्र गोडगे यांचे शिष्टमंडळ  यांना जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी 25 डिसेंबर पर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम देऊ असे  आश्वासन दिले आहे अशी माहिती आंदोलन कर्ते ॲड. राहुल सावंत यांनी दिली.

              मकाई सहकारी साखर कारखान्याचे  थकीत ऊस बिलासाठी वारंवार  करमाळा येथे  आंदोलन झाले. कारखाना आणि प्रशासन यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व सभासदांची फसवणूक केलेली आहे. बारा महिने होऊनही अद्यापपर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही, आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलन कर्ते शेतकरी  आक्रमक झालेले दिसून येत आहेत. शुक्रवारी दि. ८/१२/२०२३ रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात भजनी मंडळ, बैलं, गाढवं,  कोंबड्या व  विविध घोषणा यांचा समावेश झालेला दिसून  आला. यावेळी थकीत ऊस बिलाची

रक्कम पंधरा टक्के व्याजासहित मिळावी अन्यथा जोपर्यंत सदरचा बोजा व फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत न उठण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांच्या वतीने  घेण्यात आली.  तर घटनास्थळी सकाळ  पासून भजन कीर्तन टाळकरी व वारकरी भक्तिमय वातावरणात भजन कीर्तन चालू होते. एका प्रकारे आंदोलनाच्या माध्यमातून देवाकडे साकडे मागितले जात असल्याचे दिसून येत होते. हवालदिल शेतकऱ्यांनी आज तहसीलच्या आवारात भेळ, कांदा, चटणी, भाकर   यांचा आस्वाद घेतला. आंदोलनाच्या  प्रमुख नेत्यांकडून सूचना येत नाही  तो पर्यंत घटनास्थळ सोडले नव्हते. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती मिळाल्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

            दरम्यान सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून मकाई कार्यकारी संचालक व अध्यक्ष यांच्यासह आंदोलन कर्ते यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले  होते. या बैठकीत चर्चा करण्यासाठी ॲड. राहुल सावंत,   दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास  झोळ सर, रवींद्र गोडगे आदींसह काही शेतकरी सोलापूर येथे पोचले. त्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या सोबत बैठक केली. यावेळी कार्यकारी संचालक खाटमोडे मिटींग ला गैरहजर होते. त्यावेळी आम्ही वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांना यांना मांडली. सविस्तर आंदोलन कर्ते यांच्या व्यथा जिल्हाधिकारी यांनी ऐकून घेतल्या त्यानंतर त्यांनी  प्रभारी तहसीलदार जाधव यांच्या मोबाईल वरून कार्यकारी संचालक खाटमोडे यांना फोन केला आणि  सोमवारी दि. 11/12/ 2023 रोजी सकाळी अकरा वाजता तुम्ही व माजी चेअरमन दिग्विजय बागल व विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांना मिटींगला उपस्थित राहण्याचे सक्तीचे आदेश दिले अन्यथा कारवाई करू.

     यावेळी आंदोलन कर्ते यांना जिल्हाधिकारी यांनी 25 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल बीलाची रक्कम देऊ अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती ॲड. राहुल सावंत यांनी दिली.  या आश्वासनानंतर सावंत यांनी करमाळा येथे बसलेल्या आंदोलनकर्त्यांना उठण्याचा सल्ला दिला अन्यथा सर्व आंदोलन कर्ते मुला बाळांसह आंदोलन ठिकाणी रात्रभर ठिय्या मारून बसणार होते.

      जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही  मागे हटणार नाही.

         यावेळी करमाळा येथे ठिय्या आंदोलन साठी हरिदास मोरे,  मोहन पडवळे,  ज्ञानेश्वर कावळे, सिद्धेश्वर कावळे, काकासाहेब गपाट, अविनाश पाटील, बाबु वाळुंजकर, पप्पू वाळुंजकर, सुंदरदास काळे, पंढरीनाथ पाटील, संतोष  मोरे, दादा जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र पाटील, शहाजी माने, दादा साबळे, नीतीन सरडे, कांतीलाल पाटील, आबा सरडे, नितीन सरडे, नामदेव सरडे, उमेश सरडे, प्रशांत पोळके, नवनाथ भांडवलकर, रामदास मोरे, बाळासाहेब रोडे, बापू पुणेकर आदी शेतकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *