करमाळा प्रतिनिधी 

कुंभेज  पवार वस्ती येथील ग्रामस्थांनी कुंभेज गावचे सुपुत्र एम.पी.एस.सी. मधुन राज्य कर निरीक्षक पदी निवड झालेले महेश बबन तोरमल तसेच खो-खो स्पर्धेत कुंभेज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीनी राज्य पातळीवर  यश मिळवल्या

बद्दल  तसे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी  नानासाहेब सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या विद्यार्थीनींना   गुरुदास सुर्वे यांनी शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी विकास सोसायटीच्या चेअरमन

पदी सौदागर सुर्वे यांचा ही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महेश बबन तोरमल यांनी  आपल्या मनोगतातुन आपल्या एम.पी.एस.सी. परिक्षेला आलेला अनुभव व अभ्यास साठी केलेले परिश्रम हे सांगितले  तसेच खो-खो स्पर्धेत तालुक्या पासुन

राज्य स्तरावरील अनुभव हा विद्यार्थीनीनीं मनोगतातुन सांगितले तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मुलाणी सर यांनी ही पालकांना  त्यांच्या  विद्यार्थीनच्या गुणाविषयी  कौतुक केले व राज्य स्तरापर्यंत पोहचण्यासाठी घेतलेले परिश्रम याविषयी

माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवर अकुंश गायकवाड सरपंच, गुरुदास सुर्वे ग्रामपंचायत सदस्य, महावीर भोसले ग्रा. सदस्य, बिभीषण कन्हेरे मा. सरपंच, बिभीषण पवार मा. सदस्य, बाबातात्या माळी मा. सदस्य, सौदागर सुर्वे वि. सो. चेअरमन,  भारत पवार, प्रविण भोसले मा. चेअरमन, नितीन भोसले मा. चेअरमन, चांगण  भाऊसाहेब सचिव, प्रविण पवार सदस्य संचालक, शामराव शिंदे संचालक, तसेच देविदास भोसले, अरुण भोसले, दादासाहेब भोसले, नानासाहेब तोरमल, सुनिल तोरमल, गणी पठाण,पांडुरंग शिंदे, पोपट शिंदे, नामदेव शिंदे, रमेश सोहणी,ऋषीकेश शिंदे, तात्यासाहेब मिसाळ, श्रीधर पवार, महेंद्र पवार, सतिश भोसले, आतुल भोसले, तसेच शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका तसेच वस्ती वरील महिला व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *