
करमाळा प्रतिनिधी
श्री क्षेत्र संगोबा येथे आदिनाथ महाराजांच्या पावन भूमीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करण्यात आला. काही माथे फिरून समाजकंटकांनी आमचे बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल

फेक भ्याड हल्ला केला. त्या माथे फिरून वर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील सर्व ओबीसी व धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती

मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, ओबीसी नेते विनोद महानवर, धनगर समाजाचे नेते महेंद्र शिंदे, अनिल तेली, शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, कैलास पवार, सामाजिक कार्यकर्ते शहाजी शिंदे,

धनगर समाजाचे युवा नेते अण्णासाहेब गोपणे, समता परिषदेचे अध्यक्ष बळीराम राऊत, आबासाहेब टकले, मनोज शिंदे, निखिल महानवर, आदि जन पदाधिकारी उपस्थित होते.
