
करमाळा येथे पतंजली योग समिती मार्फत एक दिवशीय योग शिबिर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा: दि. 5 डिसेंबर 2023 रोजी करमाळा येथे पतंजली योग समिती मार्फत एक दिवशीय योग शिबिर आणि वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी सुरेंद्र पिसे (भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी) तसेच मधुकर सुतार (जिल्हा मीडिया प्रभारी) यांचे मार्गदर्शन लाभले.

मार्गदर्शन करताना मधुकर सुतार म्हणाले की,जर तुम्ही रोज प्राणायाम करत असाल तर तुम्ही नेहमी निरोगी राहू शकता. प्राणायामामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते. यामुळे तुमचा तणाव कमी होतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. एवढेच नाही तर प्राणायाम करून रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रणात ठेवता येते. असे ही ते म्हणाले. योग प्राणायाम प्रात्यक्षिकासह त्यांनी करून दाखवले.

यानंतर वार्षिक आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीदरम्यान सुरेंद्र पिसे सर यांनी संघटन विषयी मार्गदर्शन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वर्षातील उत्कृष्ट केलेल्या कार्याची दखल घेऊन बाळासाहेब नरारे यांची जिल्हा कार्यकारणीवर निवड करण्यात आलेली आहे असे जाहीर करण्यात आले. यावेळी नरारे यांचा सत्कार करमाळा पतंजली योग समितीच्या वतीने तसेच जिल्हा कार्यकारणी च्या वतीने करण्यात आला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रवीण देवी, राजेंद्र वाशिंबेकर, हनुमानसिंग परदेशी यांनी प्रयत्न केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करमाळा पंचायत समिती

गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील सर यांनी केला. या शिबिरात 50 हून अधिक योगार्थिनीनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन संतोष पोतदार गुरुजी व आभार निशांत खारगे गुरुजी यांनी मानले.