संचालक मंडळ मनमानी कारभार करीत आहे – चोरमले

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका पतसंस्था व्याजदर वाढीचा ठराव बारगळला, पण ठराव मंजूर कसा केला.

दिनांक 3 नोव्हेंबर 2023 वार रविवार या दिवशी तालुका शिक्षक पतसंस्था मर्यादित करमाळा या संस्थेची सर्वसाधारण सभा यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा या ठिकाणी पार पडली. या सर्वसाधारण सभेत वेगवेगळे ठराव आणले गेले.

त्यापैकीच एक म्हणजे संस्थेचा व्याजदर 7.20 वरून आठ चाळीस करण्याचे नवनियुक्त संचालक मंडळाने ठराव मांडला होता. परंतु उपस्थित सभासदा पैकी 70 टक्के सभासदाने या ठरावाला विरोध दर्शविला तरीपण संचालक मंडळाने तो ठराव पेंडिंग आहे असे यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांसमोर सांगितले असताना तो ठराव मंजूर झाला नसताना सुद्धा

संचालक मंडळातील संचालक पेपर मध्ये बातम्या देऊन सभासदांची दिशाभूल करीत आहेत. परंतु हा ठराव बहुमताने फेटाळला गेला होता.

या संस्थेला 83 वर्षाची परंपरा आहे आज तगायेत या संस्थेच्या व्याजदराबाबत कुठलाही बदल झालेला नसताना सध्याचे संचालक मंडळ मनमानी कारभार करून व्याजदर वाढवून सभासदांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत .याची रीतसर

तक्रार आम्ही सहाय्यक निबंधक करमाळा यांना करणार आहे व त्या झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सर्व सह्या व सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यासंदर्भात रीतसर तक्रार करणार आहे.

अशी माहिती आमच्याकडे शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रहार चोरमले यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *