इंदापूर येथे सकल ओबीसी एल्गार मेळावा असंख्य बांधवांनी उपस्थित राहावे – विनोद महानवर 

करमाळा प्रतिनिधी

इंदापूर येथे  सकल ओबीसी  एल्गार मेळावा होणार आहे यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते  विनोद महानवर यांनी  केले आहे.

इंदापूर येथे दिं. 9 वार  शनिवार रोजी दुपारी एक वाजता नवीन नगरपरिषद मैदाना समोर ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला अन्न व पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगनराव भुजबळ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ओबीसी बांधवांनी येणे गरजेचे आहे. करमाळा

तालुक्याजवळच हा मेळावा आयोजित केला आहे यामुळे अधिक  सर्व ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते विनोद महानवर यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *