येणाऱ्या लाखो भाविकांनी यात्रा कालावधीत स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशासनाला चांगले सहकार्य केलेले असून प्रशासनाच्या वतीने शहर स्वच्छ राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांचा वापर भाविकामार्फत चांगल्या पद्धतीने झालेला आहे.

त्यामुळे यावर्षीची कार्तिकी वारी ही खऱ्या अर्थाने स्वच्छतेची वारी ठरली आहे असेच म्हणावे लागेल.

     ही कार्तिकी यात्रा स्वच्छता चांगल्या पद्धतीने ठेवली गेल्याने व प्रशासनाच्या प्रयत्नांना भाविकांनी व स्थानिक लोकांनी तेवढ्याच ताकदीने सहकार्य केल्याने यशस्वी झालेली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत शहर कशा पद्धतीने स्वच्छ राहील याबाबत दिलेल्या सूचनांना व त्यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन स्वच्छतेची केलेली पाहणी यामुळे वारी कालावधीत स्वच्छतेला खूप अधिक महत्त्व दिले गेले व लाखो भाविकांनी स्वच्छता ला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात ही कार्तिकी वारी यशस्वी झाल्याचे दिसून येते.

      जिल्हा प्रशासनाने दर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी यावर्षी चांगली उपायोजना केलेली होती. दर्शन रांगेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासनतास थांबलेल्या भाविकासमोर अन्य भाविकांनी घुसखोरी करू नये म्हणून ठीक ठिकाणी होऊ डबल बॅरिकेडींग केलेले होते. अशा ठिकाणी पोलिसा सोबतच मंदिर प्रशासनाचे कर्मचारी नियुक्त केलेले होते, जे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामुळे यावर्षीच्या कार्तिकी यात्रेत कोठेही दर्शन रांगेत घुसखोरी झालेली नाही. दर्शनासाठी लागणारा कालावधी ही यामुळे कमी झाला असल्याने  वारकरी, भाविक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. त्याप्रमाणे यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप वेळ भाविकांना थांबावे लागत असल्याने मंदिर ते पत्रा शेड गोपाळपूर या दर्शन रांगेत चार ठिकाणी विसावा केंद्र निर्माण केलेले होते. ज्यामुळे भाविकांना थकवा आल्यास ते या विसावा केंद्रात आराम करत होते. दर्शन रांगेतील या सुविधामुळे तासंतास दर्शनासाठी थांबावे लागत असले तरी विसावा केंद्रामुळे त्यांचा थकवा निघून जात होता. दर्शन रांगेतील विसावा केंद्र ही संकल्पना भाविकांसाठी खूपच लाभदायी ठरलेले दिसून येत आहे.

     संपूर्ण कार्तिकी यात्रा यशस्वी होण्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेल्या सूचनामुळे भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यशस्वी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन, मंदिर समिती प्रशासन व पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन यात्रा यशस्वी होण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. व संपूर्ण शहरात ठेवलेल्या स्वच्छते बद्दल समाधान व्यक्त केले.

        यावर्षीच्या कार्तिकी वारीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पंढरपूर शहरात एसटीने आलो. एसटी स्टँड पासून ते मंदिर परिसर, वाळवंट घाट नामदेव पायरी व  शहरात विविध ठिकाणी आम्ही फिरलो. सर्व ठिकाणी स्वच्छतेची चांगली व्यवस्था केलेली होती. दर्शन रांगेत ही स्वच्छतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. तसेच चहापाणी, नाश्ता सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्त ही ठिकठिकाणी दिसून येत होता. विशेष म्हणजे शौचालयाच्या ठिकाणी मुबलक पाणी होते व सफाई कर्मचारीही होते व शौचालयाची स्वच्छता ही पूर्वीपेक्षा खूपच चांगली होती व पुढे येणाऱ्या सर्व वाऱ्यामध्येही अशीच स्वच्छता राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा बद्दल समाधान आहे.                                                                                    – महादेव दुधभाते, भाविक, सोलापूर 

 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *