करमाळा प्रतिनिधी

सालाबाद प्रमाणे यंदाही नागपंचमी सोमवार रोजी दिनांक 17 रोजी आहे. त्याच दिवशी संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त नाभिक समाज बांधवांची बैठक आहे अशी माहिती नाभिक समाजाचे अध्यक्ष नारायण पवार यांनी दिली आहे. पवार म्हणाले की, नागपंचमी दिवशी सकाळी आठ वाजता नगरपरिषद समोरील रामचंद्र दळवी यांच्या निवासस्थाना पासून नागोबांचा रथ

रावगाव रोड वरील नागोबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढून निघणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवून उपस्थित राहावे. तसेच संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विचार विनिमय बैठक संत सेना महाराज मंदिर येथे सकाळी 11 वाजता गणेश नगर मधील मंदिरात होणार आहे तरी समाज बांधवांनी उपस्थित राहावे. 

असे आवाहन नाभिक समाजाच्या तालुका अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *