अण्णाभाऊ साठे नगर,सूमंत नगर येथे जनजागृती बैठका, भिमनगर येथे फेरी संपन्न
संविधान बचाव मोर्चा ला वाढता प्रतिसाद!
संध्याकाळी सिद्धार्थनगर येथे जनजागृती फेरी
करमाळा : येथे संविधान दिनी होणार्‍या “भव्य संविधान बचाव मोर्चा” चा तयारी जवळपास पूर्ण झालेली असून काल अण्णाभाऊ साठे नगर व सूमंतनगर येथे काॅर्नर बैठका मोठ्या प्रतिसादात संपन्न झाल्या,बैठकिंसाठी महिलांचचा विशेष प्रतिसाद लाभत आहे.
पंतप्रधान कार्यालयाचा आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय याचे संविधान बदलण्यासंबंधी वक्तव्य असो की माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी संविधानाच्या मूळ ढाच्यावर व्यक्त केलेला संशय असो कि वाराणसी च्या धर्मसंसदेत नव्या संविधानाची केलेली चर्चा असो यावर कारवाई न काढता चातुर्वर्ण व्यवस्थेचा मूक पुरस्कार चालू असल्याचे ब्राम्हणवादी मानसिकतेच्या व्यवस्थे कडून दिसून येत आहे.
संवैधानिक तरतुदिंमूळेच आरक्षित जागांवर निवडून आलेले अनुसूचित जाती जातींचे खासदार देखील ब्र शब्द काढायला तयार नाहीत त्यामुळे रस्त्यावर उतरून जनआंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे करमाळा येथे नागेशजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काहि दिवसांपासून संविधान बचाव मोर्चा संदर्भात जनजागृती बैठका संपूर्ण तालूकाभर आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून करमाळा शहरात देखील बैठका झाल्या तसेच शनिवारी रात्री सिद्धार्थनगर येथे संविधान जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.
या मोर्चा ला हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *