
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या उसाची बिल मागील वर्षीपासून दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्यामुळे असंतोषचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्याची ऊस बिल तात्काळ खात्यावर जमा न केल्यास 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करमाळा तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती

प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे की, श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी यांचे सन 2022 – 23 मध्ये एक लाख 59 हजार टन एवढे ऊसाचे गाळप झाले असूनही त्या गाळप झालेल्या उसाची बिल एक वर्षे उलटूनही अद्यापही कारखान्याने

शेतकऱ्यांना दिलेले नाही. याबाबत सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करण्यासाठी आपण त्यांना सुचित केले होते. त्यानुसार साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाधिकारी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर कार्यालयाने कारवाई करून थकीत एफ आर पी ची रक्कम 26 कोटी रुपये एवढा बोजा संबंधित

मकाई कारखान्याच्या मालमत्तेवर चढवलेला असल्याचे असे समजले आहे व लेखापरीक्षक वर्ग १ सहकार विभाग यांनी केलेल्या पडताळणीमध्ये असे लक्षात आले आहे की संबंधित कारखान्यांमध्ये कोणतेही प्रकारचे मोलिसिस बागेची इत्यादी शिल्लक ठेवलेले नाही. त्याची संपूर्ण विक्री केलेली आहे तसेच तयार झालेल्या सर्व साखरेची विक्री केलेली आहे मग पैसे गेले कुठे फक्त दोन लाख 75 हजार ची साखर कारखान्यामध्ये शिल्लक आहे. संबंधित कारखान्याच्या विविध बँकांमध्ये असलेल्या चालू सेव्हिंग खात्यामध्ये दोन कोटी साठ लाख रुपये शिल्लक आहे. परिणामी कारखान्याला वारंवार वागणी करूनही द्वितीय लेखापरीक्षक वर्ग एक तहसीलदार करमाळा प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर अधिकाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित कारखान्यांनी शिल्लक असलेल्या दोन कोटी साठ लाख रुपये एवढ्या रकमेचा तपशील दिलेला नाही. तसेच ऊस पुरवठदार शेतकऱ्यांची यादी त्यांनी उसाच्या टनाबाबत तपशील ही गुलदस्त्यात आहे. विविध बँका त्यामध्ये शिल्लक असलेले दोन कोटी साठ लाख रुपये शिल्लक रक्कम ही तरी शेतकऱ्याला वाटली जात नाही तरी संदर्भात संबंधित शेतकरी संघटना सर्व सभासद शेतकरी यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर तहसीलदार करमाळा यांनी कळलेले आहे. या थकीत ऊस बिलाच्या संदर्भात प्राध्यापक राजेश गायकवाड ही शेतकरी उपोषणाला बसले असता कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी जाऊन लवकरात लवकर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी 2023 पर्यंत बिल देण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी बऱ्याच वेळा अशा प्रकारची पत्रे संबंधित कारखाना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तारखांना यापूर्वी संबंधित प्रशासकीय कार्यालयांना दिलेले असून ही सभासद शेतकऱ्यांची खात्यावर बिले होताना दिसत नाही तरी सर्व घटनांचा सखोल अभ्यास केला असता असे दिसून येते की संबंधित कारखान्याचे तत्कालीन संचालक व पदाधिकाऱ्यांनी ऊस पुरवठार शेतकऱ्याची घोर फसवणूक केलेली आहे. सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, सोलापूर जिल्हाधिकारी, प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर, तहसीलदार करमाळा अधिकाऱ्यांनी लेखी पत्रद्वारे अगर अन्य मार्गाने आदेश लजा सूचना करूनही उपरोक्त कार्यालयाच्या कारवाईला त्या कारखान्याचे संचालक पदाधिकारी भी घालत नसल्याचे लक्षात आले आहे. आम्ही सर्व शेतकरी बांधव आपणास लेखी पत्राद्वारे विनंती करतो की ऊस बिले जमा करण्यात जबाबदार असणाऱ्या संबंधित कारखान्याच्या सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तथापी तसे न झाल्यास आम्ही 28 नोव्हेंबर 2023 पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दिनांक २० नोव्हेंबर 2023 च्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयानुसार करमाळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेला आहे. खरीप व रब्बी हंगामाचे पिकाची उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची आशा मावळली आहे. शेतकऱ्याकडूनही सामूहिक वैयक्तिकरित्या टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गंभीर परिस्थितीचा विचार करून आपण या जातीने लक्ष घालून संबंधित कारखाने सभासद शेतकऱ्याची बिले लवकरात लवकर खात्यावर जमा करण्याची हेतूने कारखान्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबतचे नियोजन साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, साखर सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आले आहे. सदर निवेदनावर प्राध्यापक रामदास झोळ सर कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, एडवोकेट राहुल सावंत, प्राध्यापक राजेश गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते, शेतकरी विकास मेरगळ, लालासाहेब काळे, देविदास गायकवाड, लालासाहेब काळे यांच्यासह शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबत गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याच्या खात्यावर बिले जमा करण्यासाठी कारखान्याला तसे सुचित करण्यात यावे अन्यथा 28 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे.