
करमाळा प्रतिनिधी
ग्रामपंचायत देवळालीचे सरपंच गहिनीनाथ रामभाऊ गणेशकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. देवळालीचे सरपंच यांच्यावर दि १९/११ रोजी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. दमदाटीने व मनगटशाहीने चुलते औदुंबर गणेशकर यांना शिवीगाळ करत बांध नांगरून नुकसान केले व बांध फोडला आहे. संबंधित घटनेत सरपंच गहिनीनाथ

गणेशकर व वडील रामभाऊ गणेशकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पुर्वी ही सरपंच यांनी ग्रामपंचायत रकमेतुन बांधलेल्या गणेशकर वस्ती – शेरे वस्ती पूलाचा रस्ता बंद केलेला. त्यामुळे संतापाने जनतेने तेव्हा ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला. तेव्हापासुन आज तागायत आज पर्यंत सरकारी जमा-खर्चातून बांधलेला पुल सरपंच यांनी बंद ठेवलेला आहे. आज

पुन्हा बांधफोडणे सारखा गुन्हा केल्याने, सततच्या मनगटशाहीला कंटाळुन देवळालीची जनता पुन्हा त्रस्त झाली आहे व देवळालीतील जनतेने सरपंचांचा राजीनामा घ्या अशी मागणी ही केली आहे .

…..
सरपंच व आमचे गटाचे सर्व सदस्य ग्रामपंचायत, गावाचा पारदर्शक कारभार करीत आहे. वरील सर्व राजकीय विरोधकांनी हे केलेले आहे यामुळे आम्ही याकडे दुर्लक्ष करून विकास कामांवर भर देत आहोत – आशिष कल्याण गायकवाड, मा. सरपंच देवळाली, ता. करमाळा