
करमाळा प्रतिनिधी
दि. १४ वीट येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या १९९८-९९ सालच्या १० वीच्या बॅचने आजच्या धावपळीच्या युगातही वीट येथे गेट-टू-गेदर उत्साहात साजरा केला. यावेळी मैत्री असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन वीट गावचे सरपंच महेश गणगे यांनी गौरउदगार काढले. त्यांच्या २५ वर्षापूर्वीच्या दहावी बॅचचा आज गेट-टू-गेदर मोठया उत्साहात संपन्न

झाला. यावेळी एकूण ४० विदयार्थी मित्रांनी एकमेकांच्या विचाराची देवाण-घेवाण करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वांनी मिळून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि आपल्या जुन्या शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्धार केला. याप्रसंगी गौतम ढेरे पुणे महसूल, गोरख ढेरे सर, प्रा. कुदळे पी.एस, हनुमंत शिंदे, प्रा. पंढरीनाथ जाधव,

सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव, सरपंच उदय ढेरे, देवा ढेरे, सचिन ढेरे, सचिन गणगे, संतोष दिवटे, वैभव काळे सरपंच करपडी, विकास पन्हाळकर, ऍड. अविनाश पवार, नागेश ढेरे, सचिन जाधव, आण्णा ढेरे,हरिश्चंद्र देवकते, पंडीत ढेरे, नंदू कांबळे, महेश भुजबळ आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
