करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ गळीत हंगाम सुरू करता येत नाही व ही जबाबदारी आपल्याला आता पेलता येत नाही हे लक्षात येताच प्रशासक महेश चिवटे यांनी माझ्यावर वैयक्तिक निखालस खोटे आरोप करून सभासदांचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. साखर कारखाना तोही सहकारी त्यातही आदिनाथ कारखाना चालविणे म्हणजे एखादे खताचे दुकान किंवा

.पिठाची गिरणी चालवणे एवढे निश्चितच सोपे नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे हिम्मत असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा देऊन आदिनाथ च्या निवडणुकीला सामोरे जावे. असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी आज केले. याबाबत डोंगरे यांनी प्रशासक महेश चिवटे यांनी केलेल्या बेछूट आरोपाबाबत खुलासा करीत सर्व आरोप खोटे असून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने व कोणताही अभ्यास न करता केलेले आहे. मी स्वतः एक सक्षम पदाधिकारी व चेअरमन

आहे त्यामुळे मी कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवलेली नाही. मी बोलायचे म्हटलं तर, मी स्वतः सक्षम आहे. वास्तविक आदिनाथ च्या परस्पर केलेल्या भंगार विक्रीतून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करून माया गोळा करण्याचे पाप प्रशासक मंडळाने केले आहे याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. कोणत्या वाहनातून भंगार रातोरात विक्रीला गेले, कोणी नेले, वाहनाचे नंबर व फोटोही आहेत. शिवाय या वाहनांची कारखान्याच्या आवक-जावक नोंदवही मध्ये कोणतीही वाहनांची नोंद नाही त्यामुळे मला अधिक बोलायला लावू नये. आदिनाथ कडील थकीत वीज बिलाबाबत गतवर्षीच्या गळीत हंगामाकरिता राज्याचे मुख्यमंत्री

यांनी स्वतः वीज मंडळ अधिकार्‍यांना सूचना देऊन वीज बिलाचे टप्पे पाडून दिले. आता या टप्प्यानुसार वीजबील भरण्याची जबाबदारी ही प्रशासक मंडळाची आहे. स्टोअरमधील चोरीबाबत करमाळा पोलिस स्टेशन ला एफ. आय. आर. रीतसर दाखल असून त्यावेळी ठसे तज्ञ व श्वानपथकही आले होते. हा तपास चालू असून त्यामध्ये आता गती देण्याचे काम शासन नियुक्त प्रशासक या नात्याने तातडीने तपास होणेबाबत प्रयत्न करावेत. दोन लाख अठ्ठावीस हजार साखर पोती विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे चिवटे सांगतात पण त्यांना हे माहिती आहे का की त्यावेळी शिखर बँकेने आदिनाथ वर सरफेशी अॅक्ट नुसार काऱवाई करून साखर पोती ताब्यात घेतली होती म्हणजे साखर पोती ही पुर्णपणे शिखर बँकेच्या ताब्यात होती. त्यानुसार ज्यावेळी शिखर बँकेने साखर विक्री टेंडर चा निर्णय घेतला त्यावेळी मला कारखान्याचा चेअरमन या नात्याने लेखी पत्र पाठवले होते त्यामुळे मी टेंडर च्या वेळी फक्त संस्थेचा चेअरमन म्हणून उपस्थित होतो. यात भ्रष्टाचाराचा विषयच येत नाही. चिवटे यांनी केलेला आरोप अत्यंत हास्यास्पद व कोणताही अभ्यास न करता केलेला आहे. साखर निर्यातीतही मी यापूर्वी अनेक वेळा प्रसार माध्यमातून वेळोवेळी खुलासा करून निर्यातीत कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. पुन्हा तीच गोष्ट उकरून काढून चिवटे काय साध्य करीत आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्यांचे डोळे पिवळे आहेत त्यांना सर्व जगालाच कावीळ झाल्याचे वाटते. मी माझ्या अधिकाराचा गैरफायदा कधीही घेतला नाही. वास्तविक पाहता महेश चिवटे आपली जन माणसात काय प्रतिमा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बागल गटाच्या नेत्यांना सल्ला देण्याऐवजी स्वकर्तुव्त दाखवून ग्रामपंचायत वॉर्ड, नगरपालिका वॉर्ड मधून एकदा तरी निवडून येऊन दाखवावे. मागील नगरपालिका निवडणुकीत करमाळा शहरातून त्यांचे डिपोजिट जप्त झालेले आहे. त्यामुळे चिवटे हे वैफल्लग्रस्त झालेले असून चर्चेत राहण्यासाठी आदिनाथचा वापर करणे चुकीचे आहे. तुम्हाला राजकारणात आमचे दैवत लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांनी मकाईचे संचालक करून संधी दिली होती ती तुमच्या गुणामुळे गेली हा भाग वेगळा त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे अशी तुमची अवस्था आहे. खरच धमक असेल तर तुम्ही प्रशासक पदाचा राजीनामा देऊन आदिनाथ च्या निवडणुकीला सामोरे जावे विनाकारण बेछूट आरोप करू नये. आम्ही गप्प बसतो याचा अर्थ कृपया वेगळा काढू नये माझ्यासारख्या सर्वसामान्य व निष्ठावान कार्यकर्त्याला माझ्या नेत्यांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची संधी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *