
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ शासन नियुक्त प्रशासक, प्रशासक मंडळ, प्रभारी एम.डी. अरुण दिनकर बागनवर हे बेकायदेशीरपणे काम करीत आहेत कामगारांना काही कामावर घेत नाहीत. तसेच कारखाना आर्थिक नुकसानीचे कारभार करतात. सर्व कायम व हंगामी कामगाराला कामावर घेण्यात यावे व प्रशासक प्रशासक मंडळ प्रभारी एम.डी. यांना पदावरून का हटवत नाही ? याबाबत प्रभारी

एम.डी. हे सुएल 22 चा अवमान करत आहेत. अशी तक्रार महादेव मच्छिंद्र मस्के यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. पुढे तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, आदिनाथ प्रशासक मंडळ व प्रभारी एमडी हे मनमानी व बेकायदेशीरपणे कारभार करतात. त्यामुळे मी दि. 17/11/2023 रोजी कारखाना कारभारांचा, प्रशासक मंडळ व प्रभारी एमडी चा निषेध म्हणून महेश चिवटे यांच्या देवीचामाळ रोडवरील घरासमोर 11 ते 12:30 पर्यंत अर्धनग्न गांधीजींच्या अहिंसक मार्गाने ठिया आंदोलन करणार

आहे. तसेच 17/11/2023 पासून आमरण उपोषण चालते फिरते करणार असल्याबाबत. मागण्या सर्व हंगामी व कायम कामगारांना कामावर घेण्यात यावे, सर्व कामगाराला मागील चार ते पाच वर्षापासून इन्स्टीमेंट व महागाई दिलेली नाही ती चालू महिन्यांच्या नोव्हेंबर 2023 पासून पगारात वाढ करून द्यावी, प्रभारी एमडी अरुण बागनवर हे काही कामगारांना कोर्टातून कामावर ये असे तोंडी सांगतात, प्रभारी एमडी कार्यकाळ सहा महिन्यापेक्षा जास्त नसतो तर लोक नियुक्त संचालक

मंडळ व शासन नियुक्त संचालक मंडळ हे प्रभारी एमडी यांना पदावरून का हटवू शकत नाही, प्रभारी एमडी मुळे कारखान्याला आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे त्यांना हटवावे, प्रभारी एमडी याला जर हटवायचे व काढायचे नसेल तर तुमचा कारभार व रश्मी बागल व धनंजय डोंगरे यांच्या कारभारात काय फरक राहिला, प्रभारी एमडी यांना हटवले नाही तर शासन नियुक्त मंडळाला भ्रष्ट कारभार करायचा आहे का असे मला सभासद व कामगार म्हणून वाटते, प्रभारी एमडी अरुण दिनकर बागनवर यांना तातडीने पदावरून काढावे, महेश चिवटे हे राजकीय स्वरूपाची भाषा करतात न्यायालयात 15 मिनिटे भाषण केले व अर्धा पगार आम्ही कारखान्यामार्फत करतो तरी कोणतीही कार्यवाही प्रभारी एमडी ने होऊ दिली नाही त्यामुळे मी काळी दिवाळी भीक मागून साजरी करतो व तुमचा निषेध करतो कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारखाना प्रशासक जबाबदार राहील, आदिनाथ वर लोकनियुक्त संचालक मंडळ ही कामगारावर अन्याय करते 80 ते 85 पगारी थकवल्या व तुम्ही प्रशासक मंडळ आल्यापासून चार्ज घेतल्यापासून किती पगारी थकीत ठेवल्या हे जाहीर करावे, कामगाराच्या हितासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल पण त्याच्या मार्गाने न्यायालयात लढत राहू असे निवेदन महादेव मस्के यांनी तहसीलदार करमाळा यांना दिले आहे. याची प्रत जिल्हाअधिकारी सोलापूर, कामगार आयुक्त सोलापूर, डी.डी.आर. सोलापूर, साखर आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक करमाळा, आदिनाथ प्रशासक मंडळ, शेतकरी कामगार संघर्ष समिती अध्यक्ष दशरथ रावजी कांबळे यांना दिले आहे.