
करमाळा प्रतिनिधी
श्रीराम प्रतिष्ठान अन्नपूर्णा योजना करमाळा यांचे तर्फे दररोज निराधार महिला व पुरुष यांना दररोज दोन वेळा अन्नदान केले जाते. याच ठिकाणी श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट देवीचा माळ यांचे कडून निराधार महिलांना आज दीपावली सणानिमित्त

मोफत साडी वाटप करण्यात आले. साडी वाटपचे हे द्वितीय वर्ष आहे. यावेळी श्री जगदंबा कमला देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, डॉक्टर महेंद्र नगरे, अँड.

शिरीषकुमार लोणकर, सुशील राठोड, राजेंद्र वाशिंबेकर, प्रशासन अधिकारी महादेव भोसले, अशोक गाठे, कमलाकर सोरटे, लक्षमण हवलदार, रघु खटके उपस्थित होते.

