
करमाळा प्रतिनिधी
गुरसळी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते नवीन ट्रांसफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले.

गुळसडी गावात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यात आले आहे ,परंतु या जल जीवन मिशन योजनेच्या सिंचन विहिरी वरती लाईटची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऐन दुष्काळामध्ये ही योजना बंद होती. त्यामुळे गावातील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होत होते. यामुळे

आम्ही सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्याकडे ट्रांसफॉर्मरची मागणी केली. यावर गणेशभाऊ चिवटे यांनी लगेच प्रशासकीय लेव्हलवर मदत करून अवघ्या चार दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून चालू करून दिला. त्यामुळे ही योजना लवकर चालू होऊन याचा गुरसळी ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व गुरसळी ग्रामस्थांच्या वतीने गणेश भाऊंचे आभार व्यक्त करतो. असे मत गुरसळीचे सरपंच प्रमोद भंडारे यांनी व्यक्त केले,

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,गुरसळीचे सरपंच प्रमोद भंडारे, उपसरपंच योगेश भंडारे, माजी सरपंच समाधान यादव, ग्रा. सदस्य महावीर कळसे,ग्रा.सदस्य नारायण भाऊ भोसले, माजी सरपंच व पोलीस पाटील धनंजय अडसूळ, तंटामुक्ती चे अध्यक्ष मकरंद बापु खंडागळे, माजी ग्रा. सदस्य तानाजी खंडागळे, संतोष शिंदे, शरद यादव, राहुल यादव, पांडुरंग कळसे, बापु मोहोळकर, सतिष बागल, आण्णा भंडारे, शामराव पडवळे,राज भंडारे, अविनाश सुर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
