
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेलगाव भाळवणी या कारखान्यावर सध्या प्रशासक कार्यरत असून प्रशासकाने चोरीच्या मार्गाने लाखो रुपयाची वाहने विकून भ्रष्टाचार केला आहे. अशी माहिती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रमेश कांबळे यांनी दिली आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लावण्याकरीता दहा लाख रुपये भरण्यात आले होते परंतु काही बाह्य शक्तींना हा कारखाना ताब्यात ठेवायचा होता म्हणून त्यांनी प्रशासकाचे नियुक्ती केली आहे. परंतु प्रशासकीय येताच त्यांनी कोणताही भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथ घेतली होती व त्यांनी चालू असलेल्या

संचालक बोर्डावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु स्वतः धुतल्या तांदळासारखे आहे. असे दाखवून कोणत्याही प्रकारचे भंगारचे टेंडर न काढता व जप्त केलेले वरील क्रमांकाचे वाहन विक्री कोणत्याही प्रकारे कारखान्याला करता येत नसताना देखील रातोरात कट करून विक्री केलेली आहे. विक्री केलेल्या वाहनांचे पैसे कारखान्याच्या खात्यावर भरलेले नसून कोणत्याही

प्रकारची नोंद कारखान्याकडे नाही परंतु हि सर्व वाहने कोणत्या वाहनातून कारखान्यातून भरून नेले व कशाप्रकारे कट करण्यात आली. हे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने प्रशासक भ्रष्ट आहे तरी या प्रशासक मंडळावर चोरीचा गुन्हा दाखल करून प्रशासक मंडळ बडतर्फ करून नवीन संचालक मंडळ नियुक्त करावी. सदर प्रशासक मंडळावर गुन्हा दाखल करून घ्यावा. सर्व वाहनांचे पुरावे आम्ही योग्य त्या वेळेस देऊ असेही अखेर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रमेश कांबळे यांनी दिली आहे