करमाळा प्रतिनिधी

दलित सेना महिला आघाडीच्या अध्यक्ष निलावती बुवाजी कांबळे यांनी दिपावलीच्या निमित्ताने गोरगरीब,विधवा,परित्यक्ता व निराधार आणि वृद्ध महिला यांची दिपावली सुखा समाधानाने जाण्यासाठी त्यांना 40 क्विंटल (प्रती महिला-2 kg) साखर, मैदा व रवा याचे वाटप करण्यात आले. बहुसंख्य महिला लाभ घेण्यासाठी उपस्थित होत्या. सर्व महिलांनी स्वतःच्या

आरोग्याची काळजी घ्यावी. स्वतः पुढे येऊन घरगुती छोटे उद्योग सुरू करावेत. यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत आपण घ्यावी. म्हणजे समाजासाठी आपण आदर्शवादी ठराल. असे मत निलावती कांबळे यांनी व्यक्त केले.

 आदित्य भोसले, बबिता त्रिंबके, लक्ष्मी भोसले, कमल महाडिक, लक्ष्मण पवार, मनोज बोबडे, श्रेयश बोबडे व मतीन दळवी इत्यादी मान्यवर वाटप कार्यक्रमास उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *