करमाळा प्रतिनिधी

क्षितिज महिला ग्रुप, करमाळा यांच्या तर्फे श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नदान लाभार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करमाळा शहरामध्ये करण्यात आले. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गेली सहा वर्षापासून करमाळा शहरातील व तालुक्यातील निराधार

वृद्ध आजी-आजोबांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते. हा उपक्रम श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली  चालू आहे. या अन्नपूर्णातील वृद्ध निराधार आजी-आजोबांना क्षितिज महिला ग्रुप करमाळा यांच्या वतीने

सालाबाद प्रमाणे या वर्षीही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी क्षितिज महिला ग्रुपच्या डॉक्टर सुनिता जोशी व स्वाती माने यांनी श्रीराम प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी  श्रीराम प्रतिष्ठानचे

सदस्य भीष्माचार्य चांदणे सर, विलास आबा जाधव यांनी  क्षितिज ग्रुपचे आभार मानले. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य रामभाऊ ढाणे, संग्रामसिंग परदेशी, संजय किरवे, महादेव गोसावी व क्षितिज महिला ग्रुपच्या पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *