
करमाळा प्रतिनिधी
दिपावलीच्या पहिला दिवस गोवत्स द्वादशी वसुबारस निमित्त श्री पांजरपोळ गो-रक्षक संस्था करमाळा येथील गो-मातेची पुजा केली. अनेक मातृशक्तींनी गो-मातेची पुजा केली व दिप दिव्यांनी आरती केली. गो-शाळेचे संचालक भरत गांधी यांनी

पांजरपोळ संदर्भात माहिती दिली. यावेळी तालुका संघ चालक डॉ. श्रीराम परदेशी, तालुका सहकार्यवाह अनंत मसलेकर, तालुका महाविद्यालयीन प्रमुख संघर्ष दयाळ, भाजपचे डॉ. नरेंद्र सिंह ठाकुर, जेष्ठ स्वयंसेवक व्यापारी राधेश्याम देवी, प्रा.

शिक्षक संघटनेचे घोलप गुरुजी, भाजपचे माजी अध्यक्ष महेश परदेशी, गो-सेवक झाकीर भाई पठाण, संगम मिठाईचे मालक, गो-सेवक संदीप चुंग, विजय देशपांडे करमाळा, शहरांतील अनेक व्यापारी, महिला व गो-सेवक उपस्थित होते.
