करमाळा प्रतिनिधी

गणेशनगर, कृष्णाजीनगर, शाहूनगर येथील ओपन प्लेससह परिसरातील वाढलेली काटेरी झाडे-झुडपे काढून सदरील भाग स्वच्छ करुन याच परिसरातील गटारी तुंबल्यामुळे सदर भागात दुर्गंधी सुटलेली असून कित्येक गटारी वरुन वाहत आहे. या

दुर्गंधीचा सामना परिसरात राहणाऱ्या लोकांना करावा लागत आहे. तसेच गटारीच्या बाजुला वाढलेली झाडे झुडपे काढून घेण्यात यावे. त्यामुळे गटारी काढता येत नाही. या भागात स्वच्छता करणे गरजेचे आहे. याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यास सदर भागातील लोक नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहेत. संभाव्य परिस्थिती पाहता नगरपरिषदेने

तात्काळ या भागाकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी पाठवून स्वच्छता करावी. याच भागात राहणाऱ्या लोकांना नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ला फार मोठे मोलाचे सहकार्य केले आहे. तोच लोकसहभाग भविष्यकाळात नगरपरिषदेस फलदायी ठरेल. याबाबत मुख्याधिकारी करमाळा यांना स्वाती महादेव फंड यांनी अर्ज केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *