करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक लक्ष्मण राख यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त पुनवर येथील सात गोर-गरीब, निराधार महिलांना किराणामालाचे किट (शिधा) वाटप

करण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून व पुनवर गावाविषयी असलेले प्रेम यानिमित्त दरवर्षी प्रा. राख सर आपल्या स्व-खर्चातून शिधावाटप करतात. यावर्षी पण हा शिधावाटप करण्यात आला. याप्रसंगी प्रा. पोपट कुदळे, प्रा.दिलीप थोरवे,

उपसरपंच रोहिदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ नरसाळे, पोपट जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ थोरवे, बापू बेद्रे,  रवी जाधव, विलास गोरड, बाळा जाधव, सुनिल जाधव, नानासाहेब ननवरे, गुरुलिंग ननवरे, भाऊ धगाटे, फयाज पठाण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *