१६ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी

पुणे या ठिकाणी धनगर समाज सेवा संघा तर्फे १६ व्या राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर नवी सांगवी पिंपळे गुरव

पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे. असे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष व संस्थापक मुकुंदराव कुचेकर यांनी पत्रकाराद्वारे जाहीर केले आहे. धनगर समाजातील सर्व पोट जातीमधील धनगर समाज बांधवांनी आपल्या इच्छुक वधू-वरांची नावे १

डिसेंबर २०२३ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी, नावे नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आपल्या शिक्षित मुला मुलींना वधू वर निवडीसाठी एकमेव मेळावा म्हणजे धनगर समाज सेवा संघाचा असल्याचे पुणे शहर कार्यकारणी सदस्य संजय सरवदे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *