करमाळा प्रतिनिधी

            करमाळा गट पातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सह. संस्था मर्या; करमाळा या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडुन सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाची निवड संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संचालक विजय सुपेकर यांचा चेअरमन पदासाठी

एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी माने यांनी त्यांची बिनविरोध निवड केली तर व्हाईस चेअरमन पदी हनुमंत अवघडे यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.

       सकाळी अकरा वाजता सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात निवडणुक बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक राजेन्द्र कुंभार, लक्ष्मण परदेशी, रमेश चांदणे भैरवनाथ अडसुळ, दादा पालवे, सुधीर चव्हाण, शंकुतला जगताप, नंदा जगताप तसेच संस्थेचे सचिव अल्ताफ शेख आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *