करमाळा प्रतिनिधी

मौजे जेऊरवाडी ता. करमाळा जि. सोलापूर येथील रहिवाशी ग्रामस्थांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे चालू आवर्तनातून जा.क्र. कुडाकउपवि-12 प्रशा / 298 / सन 2023 अन्वये नुसार जेऊरवाडी गावातील नाल्याच्या लगत असणाऱ्या लाभक्षेत्रातील

शेतकऱ्यांसाठी मागणीनुसार प्रत्येकी 1 दिवस असे एकूण तीन दिवसाचे आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येईल असे लेखी पत्र असून देखील आम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारे आमच्या हक्काचे पाणी वारंवार विनंती करून देखील दिले जात नाही. तरी

आपणास विनंती आहे की, आम्हाला आमच्या हक्काचे पाणी प्रत्येकी 8 दिवसातून 5 तास सोडण्यात यावे. आम्ही सर्व आमरण उपोषणाला बसलो आहे. तरी आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे. अशी निवेदन जेऊरवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी

तहसीलदार करमाळा यांना दिले आहे. निवेदनावर योगेश निमगिरे, हनुमंत निमगिरे, दीपक निमगिरे, नामदेव निमगिरे, गणेश  शिरसकर, गोरख निमगिरे, अनिरुद्ध वाघमोडे, सागर वाघमोडे, विजय निमगिरे, विकास निमगिरे, गोरख शिंदे, नवनाथ शिरसकर, संदिपान वाघमोडे, गणेश वाघमोडे, संपत निमगिरे, सुनील निमगिरे, मारुती निमगिरे, महादेव निमगिरे, दादासाहेब निमगिरे या सर्वांच्या सह्या आहेत.   

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *