करमाळा प्रतिनिधी  

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मांगी तलाव कुकडी मध्ये वर्ग करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी दिल्लीस्थित वेबकॉस या केंद्र सरकारच्या संस्थेसोबत बैठक होणार असलेची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, कुकडी प्रकल्प फेरलनियोजन मध्ये

मांगी तलावाचा समावेश कायमस्वरूपी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही मागणी शासन दरबारी लावून धरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत शिफारस पत्र मिळवले आहे. यामुळे कुकडी व कृष्णा खोरे विभागाने फेरजलनियोजनसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या अंतर्गत केंद्र सरकारच्या

वेबकॉस या संस्थेचा अहवाल आल्यानंतर कुकडी प्रकल्पाचे फेरजालनियोजन होणार आहे. या फेरजलानियोजनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केल्याप्रमाणे मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश होणार आहे. मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश झाल्यानंतर या भागातील २५-३० गावातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसाची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं पूर्ण होणार आहे असेही चिवटे शेवटी म्हणाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *