
गत वर्षीच्या संततधार पावसाच्या नुकसानीची मदत लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी csc सेंटर ला आधार प्रामाणिकरण त्वरित करून घ्यावे: नितीन झिंजाडे
करमाळा प्रतिनिधी
गत वर्षीच्या संततधार पावसाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी जवळील csc सेंटरमध्ये आधार प्रामाणिकरण त्वरित करून घ्यावे असे आवाहन भाजपाचे नितीन झिंजाडे यांनी केले आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, गत वर्षी करमाळा तालुक्यातील शेती पिकाचे संततधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संततधार पावसाने शेती पिकाचे झालेले नुकसान ग्राह्य धरून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी मदत केली होती. ही नुकसान भरपाई इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापूर्वीच मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी या मदतीपासून वंचीत असलेची बाब भा.ज.पा. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी उपविभागीय अधिकारी माढा यांना यासंबधी शेतकऱ्यासमोरच सूचना केल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना गत

आठवड्यात पंचनाम्याप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झाली. परंतु पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आधार प्रामाणिकरण करणं गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळतील. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळील csc सेंटर मध्ये जाऊन आधार प्रामाणिकरण करून घ्यावे असे आवाहन झिंजाडे यांनी केले आहे.