करमाळा प्रतिनिधी 

करमाळा नगरपरिषद मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्म दिना निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न.

        बुद्धीवादी, विज्ञानवादी समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहिद डॉ. नरेंद्र अच्युत दाभोळकर यांच्या जन्मदिनाचे  औचित्य साधून नगरपरिषद प्राथमिक  मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रथम दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

करून त्यांच्या कार्याची ओळख प्रशालेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला सतीश टांगडे मॅडम यांनी केली. कार्यक्रमाची सुरुवात  अनिल माने यांनी प्रबोधन गीताने केली. मान्यवरांचे स्वागत श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये तथाकथित चमत्काराचे व हातच्यालाखीचे प्रयोग दाखवण्यात आले. त्यामध्ये विनावातीचा पाणी टाकून दिवा पेटवण्यात आला. हा प्रयोग पाहून विद्यार्थी चकित झाले. हातावर पैसा छापा-काटा उलटा न पडता त्याच बाजूने  कसा पडतो हे

दाखवण्यात आले. मुलांच्या शंकाचे निरसन करण्यात आले व समाजामध्ये लोकांची कशी फसवणूक केली जाते व लोक अंधश्रद्धेला कसे बळी पडले जातात यावर माहिती सांगण्यात आली. समाजात असणाऱ्या अनिष्ट व वाईट परंपरा सांगण्याची माहिती देण्यात आली  यामध्ये अंगात येणे, भूत लागणे, आजारी पडल्यानंतर दवाखान्यात न जाता मांत्रिका कडे जाणे, हे कसे चुकीचे आहे हे सांगण्यात आले, तसेच फटाका मुक्त दिवाळी साजरी  करण्याचे आवाहन करण्यात आले, त्याचा  पर्यावरणाला कसा धोका आहे हेही सांगण्यात आले, फटाक्यामुळे मुलांना होणारे अपघात कसे होतात हेही सांगण्यात आले. शेवटी चमत्कारामागील त्याचे शास्त्रीय कारण काय आहे हे अनिल माने यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण केला. कार्यक्रमांमध्ये या संघटनेचे मान्यवर  दिगंबर साळुंखे, संजय हांडे,  अनिल माने,   राजेंद्र साने यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक  मुकुंद मुसळे सर,  बाळू दुधे सर, भोसले मॅडम यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार  संतोष माने सर यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *