करमाळा प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना वंदन करून उपोषण सुरू करण्यात आले. मकाई सहकारी साखर कारखाना या कारखान्याने गेल्या ऊस गळीत हंगामाची बिले अद्याप दिलेली नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. ऊस नेऊन दहा ते अकरा महिने झाले आहेत. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे सण पोळा, महालक्ष्मी, गणपती, दसरा असे कितीतरी सन गेले आणि आता दिवाळी तोंडावर आली असताना देखील शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसतील तर प्राध्यापक राजेश गायकवाड यांनी श्री आदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे 31/10/2023 मंगळवार रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांना अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आहे, लोकांना काम नाही, रोजगार उपलब्ध नाही, हक्काचे ऊस मकाईला घातलेला आहे तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. खरोखरच शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या सर्व कारणास्तव मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. प्राध्यापक राजेश गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यांच्या उपोषणास सर्व सभासद आणि शेतकरी वर्ग त्यांना जाहीर पाठिंबा देत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *